राज्याभिषेकाची तयारी



गागाभट्ट,बाळंभट्ट आणि रायगडावरील सर्व मंडळी राज्याभिषेकाच्या तयारीत चूर होती.राजसभा सिद्ध झाली.सुवर्णसिंहासन आकार घेत होते.सिंहासना चे काम रामाजी प्रभु चित्रे हे पाहत होते. अमोलिक रत्नें सिंहासना वर जडवण्यांत येत होती.एकूण बत्तीस मण सोने या सिंहासनासाठी लागणार होते.अभिषेकाचे विविध कलश तयार झाले होते.मोत्यांच्या झालरीचे रत्नजडीत छत्र,मोर्चेले,चौऱ्या,शूल,तराजू,मत्स्य वगैरे राजचिन्हे तयार होत होती.
आता मुख्य म्हणजे मुहूर्तनिश्चय.व्यंकोजी राजे,संभाजी राजे,गागाभटांच्या सर्व पंडिताच्या व महाराजांच्या विचाराने त्या भाग्यशाली तिथीवर कुंकवाचे गंध शिंपडले.मुहूर्त ठरला.श्रीनृपशालीवाहन शके १५९६ आनंदनाम संवत्सरे,ज्येष्ठ शुद्ध १३ शनिवार (६ जून १६७४) सुर्योदया पुर्वी तीन घटका,उषःकाली राजश्री शिवराय सिंहासनावर बसणार.हा मुहूर्त गागाभट्टानी अत्यंत अभ्यासपुर्ण चिकित्सेने निश्चित केला.
सर्व नातेवाईकांना,प्रजेला,थोर मंडळींना थैल्या निमंत्रणाच्या थैल्या रवाना झाल्या.हजारो मंडळी गडावर येणार होती.तेंव्हा त्यांच्या राहण्याजेवणाची व इतर सर्व गोष्टींची व्यवस्था रायगडावर अति उत्तम करण्यात आली होती. सर्व गोष्टी अगदी व्यवस्थित,थाटात व वेळच्या वेळी घडाव्यात यासाठी फार दक्षता घेण्यात येत होती.राज्याभिषेकास अजुन दोन महीने अवकाश होता.
राज्याभिषेकाची तयारी‬

No comments:

Post a Comment